बाबासाहेब गावडे हायस्कूलचे स्नेहसंमेलन

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे हायस्कूल, वरळी या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा ललित कला भवन, जांभोरी मैदान, वरळी येथील सभागृहात मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा मंदिर विद्यावर्धिनी शाखेचे अध्यक्ष योगेश पवार यांनी भूषविले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम बाळकृष्ण केंजळे हे आसनस्थ झाले होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनुभवाने व ज्ञानाने परिस्थितीवर मात करता येते असा मोलाचा संदेश या वेळी दिला. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध परीक्षांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने नृत्याविष्कार व समूहगीते सादर केली.

या प्रसंगी मराठा मंदिर संस्थेचे मान्यवर पदाधिकारी मनोहर साळवी,श्री. व सौ. साळुंखे, पालक शिक्षक संघटनेच्या सचिव रेखा गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संध्या कारंडे तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी अध्यक्ष श्री. घोलप यांनी पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक किशोर शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी पिसे यांनी केले. शिक्षक नंदकुमार काळे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला.

टीम झुंजार