औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात ऑनर किलिंग!च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबादेत ऑनर किलिंग! चि घटना समोर आली आहे. बहिणीने शेजारील तरूणाशी केलेल्या आंतरजातीय लग्नाचा राग मनात धरून, लहान भावाने तब्बल 14 वर्षांनी 34 वर्षीय मेहुण्यावर धारदार कुऱ्हाडीने सपासप 6 वार करत त्याचा क्रुर खून केला. एवढ्यावरच न थांबता आरोपी साल्याने मेहुण्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून आनंद व्यक्त करत रक्ताने माखलेली हातातील कुऱ्हाड वर करून आसुरी हास्य व आनंद व्यक्त केला आणि तो महामार्गावरच अक्षरशः नाचला.
इसारवाडी फाट्याजवळ घटना :
ही धक्कादायक घटना 29 डिसेंबरला सायंकाळी 4. 40 वाजेच्या सुमारास वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद-नगर महामार्गावरील गजबजलेल्या इसारवाडी फाट्याजवळ घडली. घटनेनंतर दुचाकीवरुन पसार झालेल्या संशयित आरोपीला पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सुत्रे हलवत अवघ्या दोनच तासांत ताब्यात घेतले.
केला होता आंतरजातीय विवाह
संशयित आरोपीचे नाव सचिन शामराव नाटकर (24 रा. भोकर ता.श्रीरामपुर) असे आहे. तर, मृताचे नाव बाबासाहेब खिल्लारे (34) असे आहे. श्रीरामपुर तालुक्यातील भोकर येथे सचिन नाटकर व बाबासाहेब खिल्लारे हे शेजारी राहत होते. सचिन अवघ्या 10 वर्षांचा होता, त्यावेळी शेजारी राहणाऱ्या बाबासाहेबने सचिनच्या बहिणीला पळवून नेत तिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता.
म्हणून काढला काटा !
प्राप्त माहीतीनुसार, एकीकडे आई-वडीलांचा आंतरधर्मीय विवाह आणि त्यातच बहिणीने केलेला आंतरजातीय विवाह यामुळे गावातील लोकांकडून आपल्याला नियमीत अपमाणास्पद वागणूक मिळत असल्याने मोठ्यापणी मेहुण्याचा काटा काढायचा असा बेत सचिनने वयाच्या दहाव्या वर्षीच केला होता.
आरोपीची बहीण होती बेपत्ता !
मागील काही वर्षांपासून आपली बहिणसुद्दा बेपत्ता असल्याने तिचे काय झाले? याबाबत बाबासाहेब समाधानकारक उत्तर देत नसल्याने त्याचा राग अनावर होत होता. खून केल्यानंतर तो महामार्गावर नाचला.
सचिनकडून मेहुण्याचा पाठलाग :
गुरुवारी 29 डिसेंबर रोजी बाबासाहेब गंगापुर तालुक्यातील इसारवाडी फाटा येथे हुर्डा विक्री करणाऱ्या भाऊ आणि भाऊजईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आरोपी सचिनने बाबासाहेबचा पाठलाग सुरू केला. भोकर येथून दुचाकीवर आलेल्या सचिनने त्याची दुचाकी परतीच्या मार्गावर तोंड करत उभी केली.
असा केला खून :
सचिन संधीच्या शोधात होता. तितक्यात दुपारी साधारण 4.40 वाजेच्या सुमारास मेहुणा बाबासाहेब हा त्याच्या भावाला भेटला. त्यानंतर दोघे चहा घेण्यासाठी निघाले असता, हातात कुऱ्हाड घेवून रस्ता ओलांडून आलेल्या सचिनने बाबासाहेबवर पाठीमागून डोक्यात कुऱ्हाडीचा जोरदार घाव घातला. काही कळण्याच्या आतच बाबासाहेब रस्त्याच्या मधोमध कोसळला.
कुणीही धजावले नाही :
सचिनचा आवेश बघुन त्याला अडवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तितक्यात त्याने आणखी साधारन पाच घाव घालून बाबासाहेबला ठार केले. तो ठार झाल्याची खात्री होताच, मोठ-मोठ्याने हसत आनंद व्यक्त करत हातातील कुऱ्हाड वरती करून सचिन महामार्गावर नाचत होता. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस निरीक्षक सचिन इंगोलो, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढोले, फौजदार लक्ष्मण उंबरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.