पारोळा : – crime news : तरुणीच्या गावापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सेल्फीही काढला.विवाहित असलेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत २२ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सेल्फी देखील काढला. हाच सेल्फी काढलेला फोटो तरुणीला चांगलाच महागात पडला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तरुणीच्या साखरपुड्यात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी साखरपुडा सोहळ्यात राडा करणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध सोमवारी जळगावातील पारोळा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी वास्तव्यास आहे. तरुणीच्या गावापासून जवळच राहत असलेल्या एका विवाहित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले.
मी माझ्या पत्नीला फारकत देत तुझ्यासोबत लग्न करेन, असे खोटे आश्वासन विवाहित तरुणाने तरुणीला दिले. याच दरम्यान त्याने तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सेल्फी देखील काढला.
दुसरीकडे, तरुणीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरविले. ९ डिसेंबर रोजी तरुणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु असताना, या ठिकाणी विवाहित तरुण आला. त्याने तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. तसेच तरुणीसोबत मंगळसूत्र घालतानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करेल, तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली.
साखरपुड्यानंतरही दुसऱ्या दिवशी तरुणी अंगणात झाडू मारत असताना तो विवाहित तरुण तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडून जवळ ओढले. तरुणीने त्याला हटकले असता, याचवेळी तरुणीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले. नातेवाईकांनी त्याला खडसावले असता विवाहित तरुणाने पुन्हा त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार करण्याची धमकी दिली.
९ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान घडलेल्या या प्रकाराविरोधात तरुणीने या प्रकरणी सोमवारी संबंधित विवाहित तरूणाविरुद्ध पारोळा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विवाहित तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.