श्री बालाजी स्वयंसेवकांकडुन मालेगांव येथील शिवपुराण कथेत श्रोत्यांना अल्पोपहाराचे वाटप…

Spread the love


मालेगांव/पारोळा – २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२२ दरम्यान मालेगांव येथे शिवपुराण आयोजन समिती, मालेगांव व मंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित श्री गुरूदेव प्रदीपजी मिश्रा यांच्या पावन वाणीने शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली होती. एकुण ७ दिवसांच्या कथेत संपुर्ण भारत भरातुन भाविक-भक्तांनी या कथेला उपस्थिती दर्शविली. यात अगोदरच्या ३ ते ५ दिवसांपर्यंत २ ते २.५० लाख भाविक उपस्थित होते. तसे भाविक-भक्तांसाठी अन्न व निवाऱ्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

परंतु कथेच्या ६ व ७ व्या दिवशी भाविकांचा मोठ्या प्रमाणावर जनसागर उमळला. यासाठी आयोजन समिती असेल, स्थानिक सामाजिक संस्था, सभोवतालील तालुका – जिल्ह्यांतुन अनेक दात्यांनी भाविक-भक्तांची अन्न, पाणी यासाठी गैरसोय होऊ नये म्हणुन उपाय योजना करून भाविकांपर्यंत पाणी, अल्पोपहार, जेवन पोहोच केले. त्याचअनुषंगाने पारोळा येथील श्रीबालाजी स्वयंसेवकांनी देखील यात आपला खारीचा वाटा नोंदविला. पारोळा येथुन कथेच्या ६ व्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर रोजी रात्री ५००० पाणी बाॕटल, ५००० बिस्कीट, ५००० वेफर्स सोबत नेत कथेतील श्रोत्यांना त्याचे वाटप केले.

यात सोनु चौधरी, गुणवंत चौधरी सर, मयुर चौधरी, चेतन पाटील, छोटु डहाके, सुनिल पवार, रूपेश सोनवणे, कुणाल पाटील, सचिन मराठे, कल्पेश जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, भैय्या मराठे, धनराज महाजन, जयेश पाटील, मंगेश कुंभार, कैलास चौधरी, गणेश बारी, धनंजय लोहार, प्रसाद महाजन, भुषण पाटील, दिनेश लोहार यांचेसह आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यात विशेषतः या कथेच्या सांगते नंतर स्वयंसेकांनी कथेचे मैदान साफसफाईसाठी देखील परिश्रम घेतले. याचे राज्याचे मंत्री मा.दादाजी भुसे व म.पोलीस अधिक्षक यांनी कौतुक करत या योगदानाबद्दल स्वयंसेवकांचे आभार मानले.
यास्तव या परिश्रमाचे व कथेस्थळी झालेल्या कौतुकाचे पारोळा शहरासह परिसरात स्वयंसेवकांचे कौतुक केले जात आहे. तसेच कुठलीही मदत, संकट यांसारख्या गोष्टींसाठी श्रीबालाजी स्वयंसेवक सदैव तत्पर असल्याचे यावेळी आपल्या परिश्रमातुन स्वयंसेवकांनी दाखवुन दिलेले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार