‘३१ डिसेंबरच्या’ रात्री धरणगावात राडा, परप्रांतीय मजुरांचा एकट्या तरुणावर हल्ला, डोक्यात दांडा घातला अन्…

Spread the love

धरणगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात एक परप्रांतीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.परप्रांतीयासोबत झालेला वाद शिरपूर तालुक्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. धरणगाव शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (वय ३० रा, दहिवद तांडा, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

धरणगाव शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंगमधील काही बिहारी मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली आहेत.

रात्रभरात पोलिसांची धरपकड मोहीम; १७ संशयित ताब्यात

पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह,पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पी.एस.आय अमोल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने अनोरे, धानोरे,गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार