ठाकरे गटाला अजून एक धक्का,एरंडोल युवा सेनेचे तालुका संघटक यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love


पारोळा :- आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी तालुक्यात आणलेली विकास कामाची गंगा, कार्यकुशल नेतृत्व या गोष्टींना प्रेरित होऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश घेत आहेत.
आज आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उ.बा.ठा. एरंडोल युवासेना तालुका संघटक गोविंदा राठोड यांचेसह खडके सिम मा.सरपंच राजु वंजारी यांनी बाळासाहेबांचा शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, एरंडोल युवासेना तालुका प्रमुख बबलुदादा पाटील, मा.पं.स.सदस्य भिडुभाऊ जाधव, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील,प्रमोद राठोड, उपस्थित होते.

आबासाहेब चिमणराव पाटील यांनी केला नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांचा सत्कार.
मा.श्री. वासुदेव सुभाष पाटील यांची वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ” जिल्हाप्रमुखपदी ” (कार्यक्षेत्र चोपडा, एरंडोल, अमळनेर, पारोळा) नियुक्ती झाल्याबद्दल आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी शेतकी संघ मा.व्हा.चेअरमन सखाराम नाना चौधरी, राजेंद्र पाटील, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, शिरसमणी येथील बाळु पाटील, मुंदाणे प्र.ऊ.मा.सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र पवार, दिलीप बिरारी, अनिल पाटील, आर.एम.पाटील सर उपस्थित होते.

टीम झुंजार