जळगाव : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमक कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मनोहर कैलास गायकवाड तांबापुरा परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत रोजंदारी वर काम करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजता मनोहर जेवण करून घराच्या मागच्या खोलीत झोपायला गेला. यादरम्यान मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आई राधाबाई मनोहरला उठविण्यासाठी आवाज देत होत्या. मनोहर कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्या खोलीत गेल्या असता मनोहर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मनोहरचा मृतदेह पाहून राधाबाई यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोहर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोहर याने आत्महत्या का केली? या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी मनोहर याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची शक्यता त्याच्या निकटवर्तीय तरुणांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन पाटील, तुषार गिरासे हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.