निंभोरा बु।।तालुका रावेर( वार्ताहर) येथील रॉयल कला ग्रुप चे संयोजक श्री राजीव तुकाराम बोरसे यांना कर्जोद तालुका रावेर येथील मौलाना अबुल कलाम आजाद वाचनालय व ग्रंथालय तर्फे 2023 चा आदर्श कलारत्न पुरस्कार देऊन आमदार शिरिष दादा चौधरी ,रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद ,जळगाव येथील डॉ.अब्दुल करीम सालार ,डॉ. राजेंद्र पाटील, सोपानराव पाटील, माजी जि प अध्यक्ष सौ रंजना पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष शेख शकील व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
बोरसे यांनी गेल्या 30 वर्षापासून गीत संगीत कला क्षेत्रात कार्य केल्याने त्यांना हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे याआधी तत्पर फाउंडेशन खिर्डी तर्फे उत्कृष्ट संगीत कलारत्न पुरस्कार देखील त्यांना आमदार चंद्रकांत पाटील, माजी जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,श्रीकांत महाजन यांच्या हस्ते मिळाला होता .त्यांना पुन्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कलावंतांनी व संबंधितांनी सत्कार करून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.