जळगाव प्रतिनिधी :- अनुराग स्टेट बँक कॉलनीत विद्युत खांबावर काही नागरीकांनी अनधिकृतपणे वायरी टाकलेल्या आहेत या वायरी रस्त्यावर लोंबकळत आहे या वायरी मुले परिसरातील रहिवासी,लहान मुले यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग, रामानंदनगर शाखा, जळगाव यांना तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
नागरिकांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की अनुराग स्टेट बँक कॉलनीतील रहिवासी विनंती वजा तक्रार अर्ज करतो की, आमच्या रहिवासी भागात असलेल्या विदयुत विज खांबावर कॉलनीला लागून असलेल्या समता नगर मधील काही नागरीकांनी अनधिकृतपणे वायरी टाकलेल्या असून आजतागायत टाकत आहेत. पोल नं. 000 008 – शांती व सदरील विज तारा या वापरातील रस्त्यावर लोंबकळत असून
साधारण 5 से 7 फुट खाली रस्त्याला लागून आहेत व त्यामुळे सर्व रहिवासी तसेच खेळत असणा-या लहान मुलांना देखील धोका असून आम्ही वायरी टाकण्यास विरोध केल्यास आम्हास शिवीगाळ करतात. सदरची बाब ही आपले कार्यालयाशी निगडीत असल्याने आपणाकडील पथकाकडून संबंधित विजतारा काढून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी. असे दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे या तक्रारी अर्जावर परिसरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.