गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात.

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रात अवैध रीत्या हत्यार बाळगणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाण वाढले असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी व त्यांचे पथक पोह.संदिप पाटील, गोरख बागुल, पोना प्रविण मांडोळे, परेश महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी आज दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी गावठी पिस्टल बाळगणारा तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चोपडा शहरात कारगील चौक भागात पिवळा टि शर्ट घातलेला इसम हा त्याचे कमरेला गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वरील पथक हे चोपडा येथे रवाना होवून चोपडा शहरातील भाऊ हॉटेल समोर मिळालेल्या बातमी प्रमाणे संशयितयुवक दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा करता तो. पळू लागला असता त्यास वरील पथकाने जागीच पकडून त्याची अंगझडती घेता त्याचे नेसलेल्या पॅन्टच्या कमरेला १ गावटी बनावटीचा पिस्तुल व त्याचे मॅगझीन मध्ये १ जिवंत काडतुस मिळाल्याने त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि.बडवाणी मध्यप्रदेश असे सांगीतले.

आरोपी अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि. बडवाणी मध्यप्रदेश यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्यांचे कडून ३००००/-रु. किं.चे १ गावठी पिस्टल, १,०००/- रु. कि.चे १ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार