Severe accident in Jalgaon : जळगावमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा दुचाकी चालवत होता. भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला खाली कोसळली, मात्र इतक्यात मागून येणाऱ्या ट्र्कने या महिलेला चिरडले. यात तिचा मृत्यू झाला. या महिलेचा आपल्या मुलाच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला.
जळगाव : जळगावमधील नशिराबाद येथे झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवर स्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेली ही महिला दुचाकीवरून प्रवास करत होती. दोन दुचाकींमध्ये धडक होऊन ही महिला रस्त्यावर पडली. रस्त्यावर पडल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडल्याची दुदैवी घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव तालुक्यातील गोदावरी हॉस्पीटलच्या पुढे नशिराबाद गावानजिक हा विचित्र अपघात झाला. जुबेदा बेग अल्ताफ बेग (वय ४८ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. डोळ्यादेखत आईच्या भयानक मृत्यूने मुलगा सून्न झाला होता.
जळगाव शहरातील समता नगरात जुबेदा बेग अल्ताफ बेग ह्या पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. मंगळवारी सकाळी जुबेदा बेग ह्या मुलगा कमीन बेग अल्ताफ बेग याच्या सोबत दुचाकीने रावेर तालुक्यातील सावदा येथे नातेवाईकांकडे साखरपुडाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी जुबेदा बेग ह्या मुलासह दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाल्या.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गोदावरी हॉस्पिटलच्या पुढे नशिराबाद गावाजवळ महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीने जुबेदा बेग यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात जुबेदा बेग ह्या महामार्गावर पडल्या. तितक्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर, मुलगा कमीन बेग हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला जवळच असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






