कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याची गरज -एपीआय रवींद्र पिंगळे.
प्रतिनिधी बाबासाहेब तिपुळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सेवाभावाने कार्य करुन वंचित, दुर्बल घटकांना आधार देणार्या जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
कोतवाली पोलिस स्टेशनचे पीआय रवींद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केटयार्ड येथील अर्पण ब्लड बँक येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये जनाधार सामाजिक संघटनेचे सदस्यांसह महिला व युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, दीपक गुगळे, शहनवाज शेख, विद्याताई तंवर, विजय मिसाळ, गणेश निमसे, गणेश गारुडकर,
मोहन काळे, राजूभाऊ लांडे, साबिल सय्यद, रफिक सय्यद, सचिन वाघमारे, प्रीतीश सूर्यवंशी, आरती शेलार, सोहेल शेख, शिवा म्हस्के, बंडू दहातोंडे, किरण जावळे, पॉल भिंगारदिवे सर, वैशाली नारळ, रोहिणी पवार, रेखा डोळस, विशाल शिवचरण, राजहंस साठे, आप्पासाहेब केदारे, बाळासाहेब केदारे, संतोष त्रिंबके, संदीप तेलधुणे, संभाजी पवार, प्रवीण राऊत, महादेव कांबळे, दादासाहेब सावंत, सुशील साळवे, विशाल अण्णा बेलपवार, महेश पठारे आदी उपस्थित होते.
कोतवाली पोलिस स्टेशनचे एपीआय रवींद्र पिंगळे म्हणाले की, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबुन रहावे लागते. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने हा रक्तदान शिबिर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतल्यामुळे कौतुक केले तसेच या शिबीरात रक्तदात्यांचा जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….