अमळनेर : – जिल्ह्यातील अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याला नाशिक येथे मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्यांचे सहकारी हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , दीपक माळी ,शरद पाटील , रवींद्र पाटील सिद्धांत शिसोदे ,एलसीबी चे सुनील दामोदरे यांच्या मदतीने शहरातील सुभाष चौकातील पारधी वाडा येथील रहिवासी राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी याचा एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
दादू धोबी याच्यावर उपमुख्याधिकारी ,पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे , पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे ,घरफोडी ,जीवघेणा हल्ला करणे ,शहरात तलवार घेऊन दहशत माजवणे ,जबरी चोरी करणे आदी गुन्हे दाखल असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीएचा आदेश केला. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,डीवायएसपी राकेश जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या पथकाने दादू धोबीला स्थानबद्ध करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.