निंभोरा प्रतिनीधी :-परमानंद शेलोडे
रावेर :- दि 9 जानेवारी आज रावेर येथील मराठा मंगल कार्यालयात दर्पण पत्रकार फाऊंडेशन च्या वतीने रावेर तालुक्यातील सहा उत्कृष्ठ पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला त्यात वर्ष
२०२२-२३ म्हणून उत्तम असे कार्य करणारे
दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी मा श्री वासुदेव नरवाडे,
देशदूतचे सावदा येथील ज्येष्ठ पत्रकार मा श्री लाला कोष्टी,
सकाळचे ज्येष्ठ बातमीदार मा श्री मिलिंद टोके, चिनावल,
पुण्यनगरीचे मा श्री अनिल आसेकर, ऐनपूर,
लोकमतचे मा श्री रमेश पाटील केऱ्हाळा,
दिव्य मराठीचे मा श्री संजय पाटील, तांदलवाडी, मराठा मंगल कार्यालय येथे सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी विशेष म्हणजे रावेर येथील निवासी झी बिझनेस च्या अतिशय गोड चेहरा व रावेरची शान अँकर भावना दिलीप चंदवाणी आवर्जुन उपस्थीती दिली त्यांच्या पण हा प्रसंगी सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी त्यांनी आवर्जुन सांगीतले की माइया यशात आई वडील व काकाचा मोठा हात होय तसेच माझी मुळ भाषा सिंधी असुन सुद्धा मी मराठी शिकले व मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण केले विविध येणाऱ्या . समस्या या वर मात केली ती माझ्या मेहनती वर तर माननीय प्रांताधिकारी कैलाश कडलग फैजपुर यांनी मनोगत व्यक्त करीत असतांना सांगीतले .

की आजही इलेक्ट्रॉनिक मिडीया आल्या नंतरही देशात प्रिन्ट मिडीया हा अभिभाज्य भाग होय यात येणारे प्रत्येक बातमी ही आपण जपुन ठेवु शकतो यात विशेष लेख सह इतर बऱ्याच काही वेगळे वाचनास मिळत असते तसेच, उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की आम्ही जे कार्य करतो यात मिडीयाचे खुप मोठे योगदान आहे तसेच रावेर व यावल तालुक्यातील स्वातंत्र्य साठी लढा देण्याचा इतिहास आहे पत्रकार हा जडण घडणाच्या कार्यात असुन त्यांचे विशेष असे कार्य होय , रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे , रावेर प्रभारी पी आय बबनराव आव्हाड , उपस्थीत होते याप्रसंगी माजी आमदार अरुण दादा पाटील , नंदु भाऊ महाजन , पद्माकर महाजन , धनंजय शिरीष चौधरी , भाजप तालुका अध्यक्ष राजन दादा लासुर कर , कॉंग्रेज तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , डॉ. सुरेश पाटील खानापुर , माजी नगराध्यक्ष हरीष शेठ गणवाणी , भाजपा तालुका सरचिटणीस सि एस पाटील , डी सरसह अनेक मान्यवर व पत्रकार बांधव .उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देशदुत चे उपसंपादक चद्रकांत विचवे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्य नगरीचे पत्रकार प्रकाश पाटील यांनी केले तर कार्यक्रमासाठी विशेष असे कार्य केले ते वरिष्ठ पत्रकार दिलीप वैदय सर , रवि महाजन , गणेश शेट्टी , लोकमतचे किरण दादा चौधरी , कुमार दादा नरवाडे यांनी विशेष असे सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






