राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी दखल घेतलेल्यानिंभोरा येथे एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम संपन्न.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
पोलीस भरतीसाठी ग्राउंड,घरकुल, गतिरोधक आदींबाबत बैठकीत चर्चा.
निंभोरा-
येथे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ग्रामीण समस्याबाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील यांनी या कार्यक्रमाची दखल घेऊन याबाबत लेखी पत्र पाठवून पदाधिकाऱ्यांचे कौतुक केलयाबाबत बैठकीत सांगितले.राष्ट्रवादीचे नेते आ एकनाथराव खडसे व जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सुनील कोंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.या बैठकीत ऋत्विक मोरे यांनी पोलीस भरतीसाठी ग्राउंड मिळण्याबाबत मागणी केली तर अरुण महाजन यांनी घरकुल यादीत नाव असताना ही घरकुल येत नसल्याचे सांगितले.अमोल धनके यांनी नवीन रस्त्यावर वाहने जोरात चालत असल्याने गतिरोधक बसविण्याची माहणी केली तर गुणवंत भंगाळे यांनी पिकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली असल्याने १६जानेवारीच्या उपोषणाला आम्ही सर्व उपस्थित राहू असे बैठकीत सांगितले.धनराज बावस्कर यांनी वडगाव रस्त्यावर किमान न्यू इंग्लिश स्कुल पर्यंत पथदिवे बसविण्याबाबत मागणी केली.या सर्व नोंदी संबंधित अधिकारी,ग्रामपंचायत तसेच पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील यांनी आपल्या निंभोरा गावाच्या या एक तास राष्ट्रवादीसाठी दखल घेत पत्र पाठविल्याबद्दल प्रल्हाद बोंडे यांनी आभार मानले तर ग्रामपंचायत स्तरावरील प्रश्नांना सोडविण्याससाठी प्रयत्न करू असे माजी सरपंच डिगंबर चौधरी यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,माजी सरपंच डिगंबर चौधरी,राष्ट्रवादी तालुका महिला सरचिटणीस आशा सोनवणे,गुणवंत भंगाळे,रवींद्र भोगे,गिरीश नेहेते,विवेक बोंडे,दिलीप सोनवणे,किरण कोंडे,जितेंद्र भावसार,गौरव कोंडे,राकेश सपकाळे,राहुल बारी यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचालन विवेक बोंडे यांनीबतर आभार प्रदर्शन आशा सोनवणे यांनी केले.

टीम झुंजार