पारोळा शहाराच्या विकासकामांसाठी आणखी १० कोटींची भर – आमदार चिमणराव पाटील

Spread the love


पारोळा – ज्या मुलभुत सोयी-सुविधा कित्तेक दशकापासुन नागरीकांना मिळाल्या नाहीत त्यामुळे शहर विकासापासुन पुर्णपणे मागे पडले होते. यामुळे नागरीकांना दैनंदिन अनेक मुलभुत सुविधांचा अभावामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा व शहर स्वच्छ, सुंदर व्हावे याची आशा अनेक दशकांपासुन नागरीक करित होते. अनेक निवडणुका येतात लोकप्रतिनिधी आपल्या पद्धतीने अनेक प्रकाराची आश्वासने देवून जातात. परंतु यात शहराचा व नागरीकांचा विकास खुंटला होता. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, शहर स्वच्छ सुंदर व्हावे व नागरीकांना मुलभुत सुविधांअभावी होणाऱ्या मनस्तापातुन कायम सुटका यासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे प्रयत्न सुरूच होते.

गत काळात पारोळा शहरासाठी अत्यंत महत्वाची ५३.६९ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली. त्याचे काम देखील प्रत्यक्षात सुरू झाले आहे. पारोळा शहरात तरूणांना तालिमेत भर म्हणुन २.५० कोटी रूपयांचा जलतरण तलाव मंजुर करून आणला. पारोळा शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमांना व्यासपिठ म्हणुन १५ कोटी रूपयाचे अद्ययावत नाट्यगृह मंजुर करून आणले. त्याचे देखील काम प्रत्यक्षात महिन्याभरात सुरू होणार आहे. आणि त्यातच अजुन मोठी भर म्हणुन १० कोटी रूपयांचा मुलभुत सुविधेच्या विकासकामांना नुकतीच मंजुरी मिळवुन आणली आहे.

यात विशेष म्हणजे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील परिसर सुशोभिकरण होणेसाठी मोठी मागणी होती. त्याचबरोबर बाजारपेठेत होणारी मोठी वाहतुक कोंडी हा दैनंदिन समस्येचा विषय होता त्यावर कायमचा आळा बसावा यासाठी स्वतंत्र विकली, फिश व मटन मार्केट बांधणे. रात्रीच्या वेळी शहरातील पुरूष, माता-भगिणी पाटील माथ्याकडे फिरण्यासाठी जातात तेथे विद्युतीकणासह अनेक समस्यांमुळे नागरीकांची गैरसोय होत होती. यासाठी पाटील माथा सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यांच्यासह रात्री फिरस्ती करण्यासाठी जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या १० कोटीच्या मंजुर विकासकामांत या कामांचा समावेश आहे

पारोळा नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील राणी लक्ष्मीबाई पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील जागेत विकली मार्केट (आठवडे बाजार) फिश मार्केट व मटन मार्केट विकसित करणेसाठी – ३ कोटी, पारोळा नगरपरिषद हद्दीतील गजानन कॉलनी परिसरात मोकळया जागेत पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील धरणगांव चौफुली चौक व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – ५०.०० लक्ष,

पारोळा नगरपरिषद हद्दीतील तांबेनगर भागातील कानबाई आयटीआय जवळील परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील मराठे गल्ली भागातील लहान राम मंदिर जवळील परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व परिसराचे सुशोभिकरण करणेसाठी – २५.०० लक्ष, पारोळा नगरपरिषद हद्दीतील जलतरण तलावाची अतिरिक्त विकास कामे करणेसाठी १ कोटी, पारोळा नगरपरिषद हद्दीतील कजगांव नाका ते न.पा. हद्दी पर्यंत, उंदिरखेडा नाका ते न.पा. हद्दी पर्यंत, चोरवड फाटा ते न.पा. हद्दीपर्यंत, अमळनेर रोड ते न.पा. हद्दी पर्यंत, धरणगांव रोड ते न.पा. हद्दी पर्यंत विद्युतीकरण करणेसाठी – ४ कोटी या विकासकामांचा मंजुरीमुळे शहरातील मुलभुत सुविधेची कामे पुर्ण होणेसाठी मोठी मदत होणार असुन आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे शहरवासीयांकडुन आभार मानले जात आहेत. तसेच शहराचा विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचेसह उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.

टीम झुंजार