पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात रेल्वे अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक घटना घडली आहे. धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने काकूचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर भागात बुधवारी रात्री घडली. काकू व पुतण्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.
हनुमान नगर भागातील दादाभाऊ मोरे हे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे परिवारासह गेले होते. ते घरी आल्यावर त्यांचा मुलगा किरण दादाभाऊ सोनार (मोरे) (२७) हा तारखेडा रोडकडे रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. त्याचवेळी रेल्वेचा धक्का लागून तो गाडीखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन उपप्रबंधकांना या घटनेची माहिती दिली.
किरणच्या अचानक मृत्यूची घटना कळताच त्याच्या काकू उषाबाई मन्नू सोनार (४०) यांना जोरदार धक्का बसला. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. यानंतर काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हनुमान नगर भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे अपघाताची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन