अमळनेर : – सध्या महाराष्ट्रात रोज नवीन नवीन घटना घडत आहेत अश्यातच अमळनेर येथून कर्नाटकातील तुमकुर येथे जाणारा ट्रक आणि त्याचा चालक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ट्रकमध्ये ३३ लाखांचा संतूर साबण होता.
सविस्तर वृत्त असे कीअमळनेर विप्रो कंपनीतून ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी पोहोचलाच नाही. त्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा साबणाचा माल लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विप्रो लि. कंपनी, अमळनेर येथून ४ जानेवारी रोजी १८ टन, १०० किलो तयार संतूर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचवण्यासाठी निघाला. हे काम नेहमी प्रमाणे मामा ट्रान्सपोर्ट कंपनी (अमळनेर) यांना याबाबतचे काम देण्यात आले. माल भरलेला ट्रक हा चालक कैलास श्रीराम गुर्जर (रा. हर्षलो का खेडा पो. भागुनगर, ता. जहाजपुर जि. भिलवाडा राज्य राजस्थान) हा घेवून कनार्टक राज्यातील तुमकूर येथे रवाना झाला होता. सदर वेळी चालकास अनिलकुमार पुनिया यांनी डिझेल व इतर खर्चासाठी ५० हजार रुपयांचे आय.यु.सी.एल. कार्ड दिले होते. त्यानुसार त्याने सदरचे कार्ड स्वीप करुन अमळनेर शहरातील प्रमुख पेट्रोल पंपावर डिझेल भरले होते व उरलेली रक्कम ही त्याने पोहच केल्यावर दिली जाणार होती.
सदरचा ट्रक दि. ९ जानेवारी रोजी पावेतो तुमकुर ,कर्नाटक येथे पोहोचणे अपेक्षीत होते. परंतु हा माल ठरल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी न पोहेचल्याने अनिलकुमार पुनिया यांनी चालक कैलास श्रीराम गुर्जर, तसेच ट्रक मालक पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर याच्या मोबाईलवर फोन करून विचारणा केली. पुनिया यांनी हा ट्रक ज्या ट्रान्सपोर्टवरुन अमळनेर येथील ट्रान्सपोर्टवर आला होता, त्या महाविर ट्रान्सपोर्टचे (जयपुर राज्य-राजस्थान) मालक मोहन बेरवा यांच्या मोबाईलवर देखील संपर्क केला. मात्र हे सर्वांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे तब्बल ३३ लाखांचा लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली.
या प्रकरणी ट्रक क्र. आर. जे. ११ जि.ए.८१३८ चे चालक- कैलास श्रीराम गुर्जर व ट्रक मालक- पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरली विहार,देवरीठा, शाहगंज, आग्रा राज्य-उत्तरप्रदेश) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.