जळगाव : – राज्यात खून, आत्महत्या आणि गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना जळगावमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. वडील धान्य मार्केट दुकानात दलालीचे काम करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सकाळी वडील कामाला निघून गेले. मुलगी ही आईसोबत घरी होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास आई गायीला पाणी पाजण्यासाठी घरातून बाहेर गेली. तितक्यात घरात एकटे असल्याची संधी साधत मुलीने गळफास घेवून जीवन संपविले.
आई घरात आल्यानंतर तिला मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलीला पाहताच आईने एकच हंबरडा फोडला होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






