प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
अहमदनगर: दि. २६/ अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे माजी सचिव मा. श्री अशोक कुद्रे सर यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन आज गौरविण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट,श्री सुबोध ठोंबरे,श्री पारुनाथ ढोकळे, श्री शाम कांबळे,जेष्ठ मार्गदर्शक श्री कांबळे सर, श्री आम्ले सर, इत्यादी सह खेळाडू, पालक व मित्रपरिवार उपस्थित होता.
अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेने 73 वा प्रजासत्ताकदिनी हा हृदयस्पर्शी सोहळा साजरा केला. प्रथम अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट यांनी कुद्रे सरानी बुद्धिबळात केलेल्या कार्या ची माहिती दिली. बुद्धीबळ मध्ये सरांनी केलेल्या अतुलनीय योगदाना मुळेचं अहमदनगर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली. त्यांच्या त्यागाची, चिकाटीची व अथक परिश्रमाची अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेला पूर्ण जाणीव आहे व आपल्या कार्याचा उचित गौरव म्हणून आपणास हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असे सांगितले.
श्री अशोक कुद्रे सरांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात ते म्हणाले की बुद्धिबळाची मला आवड व त्या मुळे मी यात रममाण होत असे. जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या माध्यमातून मी माझ्या परीने काम केले. हिंद सेवा संस्थेच्या माध्यमातून सुद्धा मी बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केल्या. श्री अशोक खरे, श्री गोविंद खरे, श्री उदय झावरे इ नी सुध्दा अहमदनगर जिल्ह्यात बुद्धीबळ या भारतीय खेळाचे प्रचार व प्रसाराचे काम केले.माझा हा सत्कार समारंभ अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेने आयोजित केला त्याबद्दल मी संघटनेचा आभारी आहे.
या प्रसंगी जेष्ट सदस्य श्री कांबळे सर व श्री आम्ले सर इ. यांनी आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.सरांचे विद्यार्थी श्री धनंजय कुलकर्णी, श्री विष्णु कुद्रे इ. नी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.अहमदनगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे विशवस्थ श्री पारुनाथ ढोकळे सर यांनी सूत्र संचालन केले तर सुबोध ठोंबरे यांनी स्वागत व शाम कांबळे यांनी आभार मानले.