जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही एक परप्रांतीय वाहन चालक थेट ट्रक घेऊन जळगाव शहरात घुसला. यादरम्यान, दारुच्या नशेत या चालकाने तीन ते चार दुचाकीस्वारांना धडक दिली. तसेच, त्याने बसलाही धडक दिली. मात्र, सुदैवाने यापूर्वीच नागरिकांनी हा ट्रक थांबवून चालकाला खाली उतरवून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावकरांनी हा थरार अनुभवला.
जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने अंधाधुंद पद्धतीने त्याच्या ताब्यातील वाहन चालवत पुढे चालणाऱ्या बससह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. यावेळी नागरीकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक याने मद्य प्राशन केलेले होते. यावेळी त्याने दारुच्या नशेत बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं.
यावेळी काही सुज्ञ नागरीक आणि तरुणांच्या सहकार्याने ट्रक विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्य धुंद चालकाला खाली उतरविले. तसेच, ट्रकच्या धडकेमुळे जखमी झालेल्या संतप्त दुचाकीस्वार आणि इतरांनी ट्रकचालकाला कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.