जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. मात्र, नाशिक मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. एकीकडे काँग्रेसला डावलून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, सत्यजित तांबेंची भूमिका नेमकी काय हे समजत नाही. त्यातूनच एका कार्यकर्त्याने त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी, तांबे यांनी आपली पुढील भूमिकाच या संवादात जाहीर केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगा पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे. तर, काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने पक्ष श्रेष्ठींद्वारे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्याविरोधातही कारवाईचे संकेत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर, सत्यजित तांबेंनी भाजपा पाठिंबा देणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, सत्यजित तांबेंसोबतचे कार्यकर्त्याचे एक कॉले रेकॉर्डींग व्हायरल झाले आहे. त्यामध्ये सत्यजित यांनी आपली पुढील भूमिका जाहीर केली.
पहा व्हायरल रेकॉर्डींग :
जळगावमधील सुधीर ठाकूर नामक मतदार कार्यकर्त्याशी बोलतानाचे हे कॉल रेकॉर्डींग आहे. त्यामध्ये, सत्यजित तांबे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशाच सांगितली आहे. मला यापुढे पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन काम करायचं आहे. मी ठरवलंय आता पक्षीय राजकारणापलीकडे काम करणार आहे. सध्या मी अपक्ष उमेदवार म्हणून काम करत आहे. लवकरच माझी भूमिकाही महाराष्ट्राला कळेल. आपण केवळ हे वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, वादळात वादळ असं व्हायला नको.
सगळं शांत होऊ द्या, मग १९ ते २० तारखेला तुम्हाला सगळं कळेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. या दोघांमधील कॉल रेकॉर्डींग आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे, सत्यजित तांबे यांच्या भूमिकेसाठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आणखी २ ते ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.