जळगाव : – महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगावात दोन मित्रांनी दुचाकी अपघातात जीव गमावला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे दोघे मित्र त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना त्यांची दुचाकी स्पीडब्रेकरवरुन उडाली आणि भिंतीवर आदळली. यामध्ये या अल्पवयीन मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील कोहूरखेडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळल्याने अल्पवयीन मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाली. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. सुरज रामदास तांबे (वय-१५, रा. काहुरखेडा ता. भुसावळ ) आणि सुनिल विठ्ठल भालेराव (वय-२०, रा. वघारी ता. जामनेर) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.
दोन मित्र भरधाव दुचाकीवरुन जात असताना अपघात
सुरज तांबे आणि सुनिल भालेराव हे दोघे मित्र सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ डी १६००) ने भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा फाट्याजवळून भरधाव दुचाकीने जात होते. त्यावेळी स्पीडब्रेकरवरून वाहन आदळल्याने दुचाकीस्वार सुनिल भालेराव याचे दुचाकीवरील ताबा सुटल्यानंतर भरधाव दुचाकी थेट नजीकच्या पुलावरील भिंतीवर आदळली.
सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत, जागीच मृत्यू
या अपघातात सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिल भालेराव याला उपचारासाठी नेत असतांना त्यांचाही जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत बोहार्डीचे पोलीस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय बाविस्कर करीत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






