तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी जमावबंदी आदेशाची केली कडक अंमलबजावणी

Spread the love

पलूस तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली आहे.

तालुक्यात कुंडल येथे तीन, पलूस येथे सात आणि भिलवडी हद्दीत चार अशा एकूण 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, काल कोरोनाच्या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता, त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता, आज तो शिथिल झाल्यावर काही नागरिक बाहेर पडत होते,  त्याला पलूस चे तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक विकास जाधव, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, पोलीस उपनिरीक्षक अझहरुद्दीन शेख यांच्यासह पोलिसांचा ताफा पलूस, आमनापूर, बुर्ली, रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, सावंतपूर येथे रस्त्यावर फिरून माईक वरुन आवाहन केले.

कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता घरातून बाहेर पडू नका, गर्दी टाळा असे आवाहन केले, तहसीलदार पोळ यांनी स्वतः जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची चौकशी केली, पलूस येथे 144 कलम आदेशाचा भंग केला म्हणून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी माहिती दिली, कोणालाही रस्त्यात विनाकारण फिरून दिले नाही, कोरोनाचा अटकाव करण्याकरिता प्रशासन जी यंत्रणा राबवत आहे, सरकार जी धडपड करत आहे त्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, जो कायद्याचा भंग करेल त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ही तहसीलदार राजेंद्र पोळ म्हणाले.

टीम झुंजार