आजचे राशीभविष्य, ( गुरुवार १९ जानेवारी २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

वृषभ :-

कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन :-

कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.

कर्क :-

भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील.

सिंह :-

बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील.

कन्या :-

तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

तूळ :-

चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. ज्ञानात भर पडेल. सतत काहिनाकाही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल.

वृश्चिक :-

कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील..

धनू :-

सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी.

मकर :-

अघळपघळ बोलू नये. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कुंभ :-

गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल.

मीन :-

बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार