मांडळ खून प्रकरणी तीन आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी

Spread the love

झुंजार प्रतिनिधी / अमळनेर

अमळनेर : – तालु्यातील मांडळ येथे अवैद्य वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा खून प्रकरणातील सहा आरोपींपैकी तीन जणांना मारवड पोलिसांनी काल सायंकाळी दोन तर रात्री उशिरापर्यंत एक अशा तीन जणांना अटक केली होती ,त्यात रोहित बुधा पारधी वय १९ ,सागर अशोक कोळी वय २२ ,गोलू उर्फ देविदास नरेश कोळी १९ सर्व राहणार मांडळ अशी अटक केलेल्या तीन जणांची नावं आहेत ,

वरील तिन्ही आरोपींना त्यांना आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती जोंधळे यांनी पांच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , यातील तीन आरोपी फरार झाले असून मारवड पोलिसांची दोन पथके शोधार्थ मागावर पाठवली आहेत त्यांना लवकर जेरबंद करू असे एपीआय जयेश खलाने यांनी दिव्य मराठी बोलताना सांगितले , आरोपींना न्यायालयात नेण्यापूर्वी मारवड पोलीस ठाण्यात डीवायएसपी राकेश जाधव हे पहाटे पासून पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते , अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपींचा शोध मारवड पोलीस घेत आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार