पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे गरजूंना धान्यवाटप

Spread the love

पाळधी-तालुका- धरणगाव
‘लॉकडाउन’मुळे कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माळी यांनी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन पाळधी परिसरात घरोघरी सुमारे 11 क्विंटल धान्याचे वाटप केले.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील, सरपंच चंदु माळी, सामाजिक कार्यकर्ते आबा माळी, यासह उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप माळी म्हणाले, ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे कष्टकरी लोकांचा रोजगार पूर्णत: थांबला आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन अन्नधान्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. पाळधी परिसरातील हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पाळधी परिसर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.’

टीम झुंजार