पुरुष मंडळी सावधान..! कारण एकूण व्हाल थक्क…मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम,

Spread the love

पुरुषांनो सावधान..! ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम
तुमच्या मोबाईलच्या अतिवापराने असंच म्हणावं लागेल कारणही तसंच काही थक्क करून देणारं आहे. या डिजिटल युगात मोबाईल ने मानवी जीवनात मोठं स्थान मिळवलं आहे. क्षणाचा विलंब न लावता एकमेकांशी संपर्क करणे असो की, फोटो, गाणे, डिजिटल व्यवहार असो की अजून बरंच काही तो फक्त मोबाईल वर करतांना दिसत आहे.

परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, ज्या प्रमाणे अँड्रॉइड मोबाईल मुळे अनेक फायदे झाले आहे त्याच प्रमाणे त्याचे मानवी शरीरावर मोठे परिणाम पण झाल्याचे दिसून आले आहे, नुकतेच एका संशोधनातून पुरुषांच्या शुक्राणूवर थेट परिणाम होतं असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय परिणाम होतोय…

नुकतेच दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण केले आहे या संशोधणानंतर तज्ञांनी सल्ला दिला की, मोबाईलममधून बाहेर पडणारे ‘विद्युत चुंबकीय तरंग’ थेट शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

मोबाईलच्या अतिवापरामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे पुरूषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या अतीवापरामुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. १८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

टीम झुंजार