Daytime sleeping is good or bad dietician and fitness expert says : आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्यानं कफ आणि पित्ताचं संतुलन बिघडू शकतं. याद्वारे तुम्ही आजारांपासून बचाव करू शकता.
थंडीच्या दिवसात दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते. पण दुपारी झोपणं प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही. आरोग्य तज्ज्ञांच्यामते हिवाळ्यात दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्यानं कफ आणि पित्ताचं संतुलन बिघडू शकतं. याद्वारे तुम्ही आजारांपासून बचाव करू शकता. आयुर्वेदात काहीजणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे.
अनेकांना झोप लागणे आणि भूक लागणे यात गोंधळ असतो. वास्तविक, असे लोक झोप लागल्यावर काहीतरी खाऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि भूक लागल्यावर झोपण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून भूक शांत होईल. पण हे अजिबात करू नये, जर वेळेची कमतरता असेल तर तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता.
तज्ज्ञांच्यामते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते. अभ्यासानुसार, सुमारे 50% लोकांना दुपारी झोपेचा फारसा फायदा होत नाही. अशा लोकांमध्ये सर्केडियन रिदम असतो. सर्कॅडियन रिदम शरीराला कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे सांगतो. जर तुम्हाला दिवसा झोप येत नसेल तर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज नाही हे दिसून येते.
निरोगी लोक फक्त गरमीच्या दिवसात दुपारी नॅप घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्र लहान असते. यामुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. याशिवाय थकवा येतो म्हणून रात्री जास्तीत जास्त झोप मिळायला हवी. जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते. जेणेकरून ताजंतवानं वाटेल.
हे वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.