दैव बलवत्तर म्हणून बालंबाल बचावले… कर्मचारी.

Spread the love

बेलापूर (देवीदास देसाई)

बेलापूर (देवीदास देसाई) – काल राजुरी जवळ विजेच्या तारा तुटल्यामुळे खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत करत असताना महावितरणचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असुन दैव बलवत्त म्हणून दोघेही कर्मचारी थोडक्यात बचावले.


बेलापुरला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा राजुरी- ममदापुर शिवारात तुटल्यामुळे बेलापुरगांव आणि परिसराचा विज पुरवठा खंडीत झाला होता, बेलापुर महावितरणचे उपअभियंता मिलींद दुधे, महावितरणचे चेतन जाधव, मधुकर औचिते,स्वप्निल पाटील, रविंद्र रौंदळ, संदीप वायदंडे, गणेश थोरात, भोकरे पवार, मनवर हे सर्वजण राजुरी येथील शेतात तुटलेल्या तारा ओढण्याचे काम करत होते, चेतन जाधव व अनिल दौंड हे अकरा मिटर उंच असलेल्या पोलवर बसुन तारा जोडण्याचे काम करत असतानाच त्यातील एक क्रॉस आर्म तुटल्याने शेजारी चेतन जाधव व अनिल दौंड यांनी प्रसंगावधान राखल्याने किरकोळ जखमी झाले.


चेतन जाधव यांच्या बोटाला जखम झालेली आहे तर अनिल दौंड यांच्या तोंडाला जखम झालेली आहे, उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खाली उतरविले व प्राथमिक उपचार केले .याही परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम करुन रात्री दोन वाजता विज पुरवठा सुरळीत केला.
आपला जिव धोक्यात घालुन हे कर्मचारी आपल्याला विज देण्याचे काम करत असतात, ते उंच पोलवर चढुन विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना आपण वेळोवेळी लाईट केव्हा येईल हे विचारण्यासाठी केलेल्या फोनमुळे त्यांच्या कामात किती व्यत्यय येत असेल याची कल्पनाच केलेली बरी, असाच अनुभव काल महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला आहे.

विज पुरवठा सुरळीत रहावा याकरीता विज कर्मचारी आहोरात परिश्रम घेऊन जीवाची बाजी लावताना नेहमी दृष्टीपथास येतात मात्र विविध सेवाभावी संस्था अथवा समाजाकडून कधीच त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कृत केले जात नाही की त्यांच्या सदकार्याची कधीच दखल घेतली जात नाही ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

टीम झुंजार