निंभोरा प्रतिनिधी:-
परमानंद शेलोडे
श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथून जाळीचा देवसाठी आज सकाळी पदयात्रा निघाली यात्रेत सुमारे दीडशे भाविक एकत्र होते सकाळी श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे पूजन करून दर्शन घेऊन यात्रा प्रारंभ झाला ही यात्रा चांगदेव हरताळा बोदवड बेटावद सावळदबारा इत्यादी तीर्थक्षेत्रावरून जाळीचा देव येथे दिनांक 4 फेब्रुवारीला पोहोचेल पाच फेब्रुवारी चा यात्रा महोत्सव आटोपून तेथेच समारोप होईल.

या यात्रेसाठी परिसरातील सावदा कोचुर मोहराला वरणगाव कर्की वेल्हाला येथील सदभक्त मंडळी आहेत कृष्ण मुर्तीचे पूजन अनिल महाजन व सौ विद्या अनिल महाजन यांनी केले ही सर्व मंडळी जाळीचा देव येथे निघाली आहे.या पदयात्रेला 17 वे वर्ष झालेले आहे.यात्रेचे आयोजन आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री सावदा व महंत राजकुमार दादा वरणगाव यांनी केलेले आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






