जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानसिक चंचलता जाणवेल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.
वृषभ :-
स्त्री समूहात अधिक वावराल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
मिथुन :-
कलेचे योग्य मानधन मिळेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
कर्क :-
धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल. खाण्या पिण्याचे पथ्य पाळा.
सिंह :-
अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल. पैज जिंकता येईल.
कन्या :-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरात काही बदल कराल.
तूळ :-
क्षुल्लक गोष्टीं वरून चिडचिड करू नका. मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.
वृश्चिक :-
स्वच्छंदीपणे वागाल. जुगारातून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल. स्व मतावर ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
धनू :-
घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. मानसिक शांतता लाभेल.
मकर :-
अघळपघळपणे बोलणे टाळा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा.
कुंभ :-
बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
मीन :-
मनाजोगा दिवस घालवाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. सौंदर्य वादी नजर बाळगाल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






