सध्या सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.मारहाण होणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पहिले असतील. पण आता विमानात झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बँकॉकहून भारतात येणाऱ्या विमानात हा राडा झाला असून या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) हालचाली सुरु केल्या आहेत. या सरकारी एजन्सीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला असून कारवाई करण्याचे सांगितले आहे.
थाई एअरवेजच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रवाशांचा एक ग्रुप हाणामारी करताना दिसत आहे. क्रू मेंबर्स याठिकाणी भांडण करणाऱ्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भांडण करणाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे.
पहा व्हिडिओ :
आता बीसीएएसचे डीजी झुल्फिकार हसन यांनी या प्रकरणी म्हटलं की, आम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे. ज्यामध्ये कोलकात्याला जाणाऱ्या थाई एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये वाद झाला होता. बीसीएएसने संबंधित प्राधिकरणाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
विमानात भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चार-पाच लोक एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. आधी शाब्दीक बाचाबाची आणि नंतर थेट मारहाण झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. दरम्यान, क्रू मेंबर्स मध्यस्थी करण्यासाठी येतात, मात्र वाद घालणारे ऐकण्याच्या मनस्थितीन नव्हते. विमानातील बाकीचे प्रवासी आपापल्या सीटवर बसून हा सगळा वाद पाहत आहेत.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.