रंगारी खिडकी ते गांधीपुरा पुलाचे भूमिपूजन.
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल-नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराच्या विकासासाठी कोणतेही पक्षीय राजकारण न करता एकत्रितपणे काम केल्यामुळे शहरात विविध विकासकामे पूर्ण झाली असल्याचे भाजपचे प्रदेश जनजाती क्षेत्र प्रमुख अँड किशोर काळकर यांनी सांगितले.रंगारी खिडकी ते गांधीपुरा या अंजनी नदीवर बांधण्यात येणा-या पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या पुलाचे भूमिपूजन योगगुरू पी.ओ.बडगुजर आणि हाजी अहमदखा करीमखा आणि उपस्थित पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.
शहराच्या विकासासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालिकेत काम केले.-अँड किशोर काळकर.
यावेळी अँड किशोर काळकर यांनी सदर पुलाच्या बांधकाम मंजुरीसाठी पालिकेतील भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेसह सर्व सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिका-याना विश्वासात घेवून सर्वांच्या उपस्थितीत पुलाचे भूमिपूजन करण्याची भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवकांची होती,मात्र विरोधकांनी विश्वासात न घेता केवळ एका पक्षाचा कार्यक्रम असल्याचे ठरवून कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला वेगळा कार्यक्रम करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.शहराचा विकास करतांना सर्वपक्षीय पदाधिका-यांनी पक्षभेद बाजूला ठेवून नगरपालिकेत एकत्रितपणे पाच वर्ष काम केले असल्याचे सांगितले.पुलाचे भूमिपूजन प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
तसेच भाजप,राष्ट्रवादी कोंग्रेसच्या पदाधिकारी वाजंत्री लाऊन आणि मिरवणूक काढून भूमिपूजनस्थळी आले होते.कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,शहराध्यक्ष बबलू चौधरी,भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,तालुकासरचिटणीस अमोल जाधव,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,भारती महाजन,नगरसेवक अभिजित पाटील,डॉ.सुरेश पाटील,असलम पिंजारी,जहिरोद्दिन शेख कासम,सुनील पाटील,प्रमोद महाजन,ईश्वर बि-हाडे,रईस शेख,छाया दाभाडे,निशा विंचूरकर,नितीन महाजन,बानोबी बागवान,सुनील चौधरी,भाजप व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते यांचेसह भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस पालिका निवडणूक स्वबळावर लढणार.
पुलाच्या भूमिपूजन निमित्त भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ विकासकामांसाठी एकत्र आली आहे,पालिका निवडणुकीशी आजच्या कार्यक्रमाचा कोणताही संबंध नसल्याचे अँड किशोर काळकर यांनी सांगितले.नगरपालिका निवडणूक भाजप सर्व तेवीस जागांवर उमेदवार उभे करून स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील पालिका निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी जाहीर केले.या कार्यक्रमासाठी तत्कालीन रमेश परदेशी यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते या कार्यक्रमासाठी हजर राहू शकले नाही असे यावेळी सांगण्यात आले.
दि 30 तारखेस या पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे व ते याप्रसंगी काय बोलताना याकडे एरंडोल शहरवासियाचे लक्ष लागले आहे.