जळगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येतेय. अशातच दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरील महामार्गावर आज मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दिपक सुरेश नन्नवरे (२०, रा. बांभोरी ता. धरणगाव) असे मृत तरूणाचे नाव असून या अपघात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
नेमकी काय आहे घटना ?
दिपक नन्नवरे हा आईवडील आणि भावांसोबत बांभोरी येथे वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. मंगळवारी सांयकाळी जळगावातील खासगी काम आटोपून दीपक हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावाकडून बांभोरी येथे दुचाकीने येत होता. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दिपक हा महामार्गाच्या मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीगावाकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला.
अपघात घडल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. तर धडक देणा-या दुचाकीवरील देखील एक जण जखमी झाला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील आणि भाउ असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






