तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील बळींची संख्या आता 6700 वर पोहोचली आहे. बचावकार्य सध्या वेगात सुरु आहे.जागतिक आरोग्य संघटनेने मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या भीषण घटनेमुळे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. डब्ल्यूएचओनेही उर्वरित देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी सकाळी 7.8, 7.6 आणि 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप झाले. यामध्ये आतापर्यंत 6700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनं भूकंपामुळे दोन्ही देशातील 23

कोटी लोकांना या फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.तुर्किमध्ये मदत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या भूकंपाची विदारक दृश्यं समोर आली आहेत. उत्तर सीरियात एका घराच्या ढिगाऱ्यातून नवजात अर्भकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. परंतु, त्याच्या आईचा मात्र मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताकडून मदतीचा हात –
भारताने मंगळवारी श्वान पथक, आर्मी फील्ड हॉस्पिटल आणि चार लष्करी विमानांमध्ये मदत सामग्रीसह शोध आणि बचाव पथक तुर्किये येथे पाठवले. 30 खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी भारताने तुर्कि येथे भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पाठवले. आयएएफच्या पहिल्या विमानात 45 सदस्यीय वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले. ज्यामध्ये क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि सर्जन यांचा सहभाग होता.

यामध्ये एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर, ओटी आदी उपकरणेही पाठवण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने एकूण चार विमाने तुर्की येथे पाठवली आहेत. चौथे विमान उर्वरित फील्ड हॉस्पिटलसह तुर्कीकडे रवाना झाले. यामध्ये भारतीय लष्कराच्या वैद्यकीय पथकातील 54 सदस्यांचा तसेच सुविधा उभारण्यासाठी वैद्यकीय आणि इतर उपकरणांचा समावेश होता.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्वीट केले आहे की, “6 टन आपत्कालीन मदत घेऊन IAF विमान सीरियाला रवाना झाले आहे. यात जीव वाचवणारी औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा यांचा समावेश आहे. या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यात भारत तत्पर आहे.

तीन महिन्यांसाठी आणीबाणी –
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मंगळवारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या 10 आग्नेय प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली. एर्दोगन म्हणाले की मानवतावादी मदत कर्मचारी आणि आर्थिक मदतीसह प्रभावित भागात अनेक आपत्कालीन उपाययोजना केल्या जातील. आम्ही या निर्णयाशी संबंधित प्रक्रिया लवकर पूर्ण करू, ज्यामध्ये आमचे 10 प्रांत समाविष्ट असतील. भूकंप झालेल्या प्रदेशात 50,000 हून अधिक मदत कर्मचारी पाठवले आहेत.

रस्त्याशेजारील इमारती, घरंही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो इमारती कोसळल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.