नंदुरबार :- सध्या महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून घातपात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नंदुरबार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सैराटच्या पुनरावृत्तीने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये बहिणीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणाची मेहुण्याने भररस्त्यात हत्या केली होती. आता असाच काहीसा प्रकार नंदुबारमध्ये घडला आहे. बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका मेहुण्याने आपल्याच भावोजीची हत्या केली.
नंदुरबार (Nandurbar) शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरात शुक्रवारी (५ फेब्रुवारी) रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली असून खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज (शनिवारी) अतिरिक्त कुमकसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता आहे.
नेमकं काय घडलं ?
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग भावाचा मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारधार शस्त्राने भोसकून (Crime News) हत्या केली.
दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण वातावरण आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, कोणीही अफवा पसरवू नयेत, शांतता राखावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले. दरम्यान, घटनास्थळासह परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण शांतता होती.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४