पाचोरा l प्रतिनिधी :- दीपस्तंभ प्रकाशनाच्या प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित स्पर्धा परीक्षा सारथी या स्पर्धा परीक्षा विषयीची सर्वंकष माहिती असणाऱ्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री दालनात मुंबई येथे करण्यात आले . प्रा राजेंद्र चिंचोले यांच्या नवीन सारथी पुस्तकाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते तसेच माननीय नामदार श्री संजय राठोड साहेब ,माजी मंत्री श्री सदाभाऊ खोत साहेब ,माननीय आमदार श्री किशोर आप्पा पाटील , आमदार श्री संजय गायकवाड, प्रा.राजेंद्र चिंचोले, स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील,
दीपस्तंभ प्रकाशनाचे वितरण प्रमुख जगदीश महाजन उपस्थित होते.प्रा. राजेंद्र चिंचोले राबवित असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या विविध उपक्रमाची माहिती किशोर आप्पा पाटील यांनी विशद केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आरसा आहे.केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती असणारे हे पहिलेच पुस्तक आहे .विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षण तज्ञ ,पालक यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
प्रा राजेंद्र चिंचोले 26 वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात .ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथे भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ग्रामीण भागातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ज्ञानप्रबोधिनी मंडळ पाचोरा या ठिकाणी त्यांनी सुरू केले .विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर म्हणून ते काम पाहतात .स्पर्धा परीक्षांवर 500 पेक्षा जास्त व्याख्याने त्यानी दिली असून सरांच्या मार्गदर्शनाने वर्ग-1 व वर्ग-2 वर्ग 3 पदी 550 पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत आहे.
विविध वृत्तपत्रांमधून राज्यभर लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांचे आतापर्यंत 650 पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांवरील लेख प्रकाशित झाले आहे .इयत्ता अकरावी व बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भौतिकशास्त्र विषयाचे लेखन मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले असून राज्य स्तरावर व विभाग स्तरावर भौतिक शास्त्र विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतात.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.