सुमित पाटील प्रतिनिधी वावडदा
दिनांक 28/01/2022 रोजी व दिनांक 29 /1/ 2022 रोजी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी हद्दीत मृत्युंजय दुत योजना या महत्वाच्या संकल्पनाने अचानक होणारे अपघात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी व त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी माननीय श्री भुषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक (वाहतुक)म. रा. मुंबई, यांच्या संकल्पनेतून मृत्युंजय दूत योजने 2021 मध्ये सुरू करण्यात आली आहे.महामार्ग पोलीस केंद्र पाळधी हद्दीत वेळोवेळी होणाऱ्या अपघातात जखमी व्यक्तींना मदत कार्य करणारे मृत्युंजय दूत म्हणुन काम करणारे
मृत्युंजय दूत 1) दीपक पाटील रा. वेले ता. चोपडा 2) सुमित पाटील गौरी ग्रुप रा. वावडदा जि.जळगाव 3) अशोक तायडे (पत्रकार) यावल 4) राहुल महाजन (हॉटेल जय मल्हार) सामनेर 5) विशाल जोशी, पहूर 6) अनिकेत पाटील वाकोद यांच्या सह यांच्या बरोबर जे मदत करता त्यांना सर्व ग्रुप मेंबर यांना01 स्ट्रेचर, 01 फस्ट एड किट बॉक्स (प्रथमोपचार पेटी) वाटप करून त्यांना महामार्ग पोलीस केंद्र पाळधी यांच्यावतीने देण्यात आले
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मेढे, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे ,पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे ,पोलीस नाईक हेमंत महाडीक ,चालक पोलीस नाईक कपिल चौधरी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी हे उपस्थित होते.
हायवे मृत्युंजय दूत संकल्पना जैन इर्रीगशन कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक जैन , उपाध्यक्ष श्री. अतुल जैन कंपनीचे श्री. चंद्रकांत नाईक यांना सांगितल्यानंतर त्यांनी मृत्युंजय दुत यांना स्ट्रेचर आणि फस्ट एड किट बॉक्स (प्रथमोपचार पेटी) साहित्य उपलब्ध करून दिल्याने त्यांचे या कार्यकरिता अनमोल सहकार्य लाभले.
महामार्ग पोलीस केंद्र पाळधी हद्दीत मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गवर अपघात कमी होण्याकरिता सक्रिय कार्य करणेबाबत यावेळी प्रोत्साहित करण्यात आले तसेच यापुढे मृत्युंजय दुत म्हणून मदत करण्यास तयार असलेल्या व्यक्तींना यात सहभागी करून घेण्यात येणार असून त्यांच्यापर्यंत असे साहित्य देऊन अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी याकरिता महामार्ग पोलीस प्रयत्नशील राहणार आहे.
सदर कार्यक्रमाला उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे ,पोलीस नाईक हेमंत महाडीक ,चालक पोलीस नाईक कपिल चौधरी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी असे उपस्थित होते.