राजकारणात स्पर्धा करायची असेल तर विकास कामाची स्पर्धा करा, मी तीन कोटी आणले तुम्ही पाच कोटी आणा – पालकमंत्री गुलाबराव पाटील.

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी | एरंडोल शहरातील रंगारी खिडकी ते गांधीपुरा भागाला जोडणाऱ्या अंजनी नदीवरील पुलाचे भुमीपूजन आज पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील होते. याप्रसंगी बोलताना ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की शिवसेनेचा तब्बल सहा वेळेस आमदार निवडून देणारा मतदार संघ हा एरंडोल आहे. या मतदारसंघाने माझ्यावर देखील भरभरून प्रेम केले आहे. या अनुषंगाने एरंडोल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये पक्षाला येथे घवघवीत यश मिळणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले.

रंगारी खिडकी ते गांधीपुरा भागाला जोडणाऱ्या पुलाची मागणी कधीपासूनच होती. आज याची पूर्तता करण्यात आली असून भविष्यात देखील एरंडोलच्या निधीसाठी कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले. एरंडोल नगरपालिकेतील विविध विकास कामांच्या निधीसाठी कोणतीही कमतरता पडणार नसल्याचे सांगत त्यांनी आमदार चिमणराव पाटील आणि आपण विकासासाठी सोबत असल्याचे नमूद केले. तर या पुलाचे आधी श्रेय उपटण्यासाठी आधीच उदघाटन करण्याऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील पालकमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले.

ते पुढे म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी जामनेर येथील कार्यक्रमाचे लोकार्पण केले असताना कथितरित्या गुप्तगू केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या पुलाचे सर्व श्रेय आमचे असताना आमच्या आधीच उद्घाटन करणाऱ्यांनी कोणती गुप्तगू केली ? याचा खुलासा करावा असे आव्हान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.

गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की मी पहिल्यांदा येथूनच आमदार झालो होतो. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील येथून आमदार झालो होतो. या काळात विविध विकास कामांना गती मिळाली. चिमण आबा पाटील यांच्या कालखंडामध्ये विकासाचा वेग देखील समाधानकारक राहिलेला आहे. मात्र एरंडोल शहरांमध्ये सध्या सत्ता नसल्यामुळे विकासकामांच्या मंजुरीसाठी काही प्रमाणात अडचणी आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी जामनेर येथील कार्यक्रमाचे लोकार्पण केले असताना कथितरित्या गुप्तगू केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या पुलाचे सर्व श्रेय आमची असताना आमच्या आधीच उद्घाटन करणाऱ्यांनी कोणती गुप्तगू केली ? याचा खुलासा करावा असे आव्हान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.

या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहकार्याने आपण निवडणुकीमध्ये नक्कीच यश संपादन करणार आहोत. एरंडोल शहराच्या विकासाच्या कामात आपण आधी देखील कोणताही दुजाभाव केलेला नव्हता. मात्र विरोधकांनी याच्या श्रेयावरून राजकारण करण्याची बाब अतिशय गैर अशीच आहे. आगामी काळात एरंडोल शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जाईल याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

सत्ता येते – जाते!- आ. चिमणराव पाटील

आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की आज वरपासून खालपर्यंत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र नगरपालिकेवर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी जनतेने एरंडोल नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की सत्ता येते – जाते मात्र जनसामान्यांचे काम जो करतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो.आम्ही शब्द पाळणारे असून रंगारी पुलाबाबत पालकमंत्री गुलाब भाऊंकडे मागणी करताच त्या क्षणाला कर्तव्यतत्परता दाखवून पालकमंत्र्यांनी तब्बल कोटी निधी मंजूर करून दिला. आज त्या पुलाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद होत आहे. हा पूल एरंडोल च्या दोन विभागांना जोडणारा असून दोन भागांचे मने जोडणारा आहे. शहरांतर्गत तसेच पुरा भागात काम करणार असल्याचे सांगितले आमदार या नात्याने मी पालकमंत्र्यांच्या सदैव पाठीशी राहील यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले.

७० वर्षांनी पुलाला सुगीचे दिवस

रंगारी खिडकी ते गांधीपूरा भागातील अंजनी नदीमुळे हे दोन्ही भागाचा संपर्क होत नव्हता. ७० वर्षांपासून सदर पूल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ३० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना रंगारी खिडकी ते गांधीपूरा पूलाचे ३ कोटी निधी चे काम मंजूर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तात्काळ ३० मार्चलाच ३ कोटीच्या या पुलाला प्रशासकीय मान्यता दिली. व दिड कोटीचा निधीही त्याच वेळेला वितरित केला हे विशेष.

अनेक पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेत

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक दशरथ चौधरी, भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैशाली ताई आंधळे, भाजपाचे माजी नगरसेवक बापू ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचा पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील , आमदार चिमणराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख मुंबईचे राजेंद्र पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदाताई पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, युवासेना तालुका प्रमुख बबलू पाटील, माजी नगराध्यक्ष तथा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा पाटील, किशोर निंबाळकर, कृ.ऊ. बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, जि प चे माजी उपाध्यक्ष हिम्मत बापू पाटील, ज्ञानेश्वर आमले, सुभाष मराठे, सुनिल चौधरी, नितीन बिर्ला, सुनिल मराठे, अनिल महाजन, शफी अली, नगर सेविका दर्शना ठाकूर, प्रतिभा पाटील, आरती महाजन, शोभा महाजन, उपतालुका प्रमुख रवि चौधरी, बन्सीलाल लोहार यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व एरंडोलवासीय उपस्थित होते.

प्रस्ताविक

माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी प्रास्ताविकात पुलाचे मंजुरी बाबत पालकमंत्री व आमदार यांचे आभार मानले.

सूत्रसंचालन

उपनगराध्यक्ष कृणाल महाजन यांनी केले तर आभार यांनी मानले

टीम झुंजार