निंभोरा प्रतिनीधी : परमानंद शेलोडे
रावेर :- लोकसभा मतदारसंघात दिव्यांग यांना एक आधार देण्याच्या प्रयोजना नुसार
देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या दुरदूष्टी तसेच समाजात दिव्यागं हा पण देशाचे अभिभाज्य अग आहे या करिता विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्या मार्फत रावेर लोकसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर” चे जळगांव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड व जामनेर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा व मलकापूर येथे आयोजन करण्यात येत आहे.
सदर “मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिरात” तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने म्हणजे फोल्डिंग ट्रायसिकल, हातचलित ट्रायसिकल, मोटराईज ट्रायसिकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, कोपर कुबड्या, रोलेटर, दृष्टीबाधितांसाठी काठी, साधे कर्णयंत्र, प्रोग्रामेबल कर्णयंत्र, कृत्रिम पाय, कृत्रिम हात ई. साधने मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली. तसेच सदर शिबिराचा जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीतजास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन सुद्धा यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.
मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर वेळापत्रक
रावेर तालुका – दि.१३/०२/२०२३,
ठिकाण – ग्रामीण रुग्णालय, रावेर.
यावल तालुका – दि.१४/०२/२०२३,
ठिकाण – ग्रामीण रुग्णालय, यावल.
मुक्ताईनगर तालुका – दि.१५/०२/२०२३,
ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर.
चोपडा तालुका – दि.१६/०२/२०२३,
ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय, चोपडा.
बोदवड तालुका – दि.१७/०२/२०२३,
ठिकाण – ग्रामीण रुग्णालय, बोदवड.
भुसावळ तालुका – दि.१८/०२/२०२३,
ठिकाण – ग्रामीण रुग्णालय, भुसावळ.
जामनेर तालुका – दि.१९/०२/२०२३,
ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय, जामनेर.
नांदुरा तालुका – दि.२१/०२/२०२३,
ठिकाण – ग्रामीण रुग्णालय, नांदुरा.
मलकापूर तालुका – दि.२२/०२/२०२३,
ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर.
टिप – सर्व दिव्यांग बांधवांनी शिबिरास येतांना दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला ई. आवश्यक कागदपत्र सोबत आणावे.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






