जळगांव: बौद्ध साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच नवोदित कवींना, साहित्यिकांना विचारमंच उपलब्ध व्हावा व बौद्ध साहित्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती औचित्य साधून जळगांव सुवर्ण नगरीत तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. बौद्ध साहित्य प्रसार संस्था (केंद्रीय) संचलित बौद्ध साहित्य परिषद द्वारा आयोजित हे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगांव येथे २ व ३ एप्रिल २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. या संदर्भात तीन जिल्हास्तरीय सभा व सहा राज्यस्तरीय सभा आतापर्यंत संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या आहेत.
या अनुषंगाने आज रोजी दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ दुपारी ३:०० वाजता शासकीय विश्रामगृह पद्मालय जळगाव येथे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाची जळगाव शहर व तालुकास्तरीय सभा तसेच संयोजन समिती सभा संपन्न झाली.
या सभेत संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन विशद केले. तसेच या संमेलनात जनक्रांती आंदोलनाचे अध्यक्ष भाऊसो मुकुंद सपकाळे यांची राज्य समन्वय समिती (सामाजिक व राजकीय विभाग) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ व ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी जळगाव शहर व जळगाव तालुका समन्वय समितीची निवड करण्यात आली. प्रा. सतीश मोरे (जिल्हा कर्मचारी समन्वय समिती प्रमुख) डॉ.अशोक सैंदाणे(साहित्य संमेलन कार्यवाह समिती प्रमुख) बाबुराव वाघ( जळगाव शहर समन्वय समिती प्रमुख) यांची विविध समिती प्रमुख पदी निवड करून त्यांचे बुके देऊन प्रा. भरत शिरसाठ यांचे हस्ते अभिनंदन करण्यात आले.
संमेलनासाठी उपस्थित असलेल्या प्रा. हरिश्चंद्र सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ व प्रा. सतीश मोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सभेमध्ये ठराव प्रक्रियेस अनुमोदन करून महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
‘बौद्ध साहित्याचा प्रसार व प्रचार करणे, वैश्विक शांतता, राष्ट्रप्रेम, बंधूभाव व प्रेमाचा प्रचार- प्रसार करण्या करीता सदर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यासाठी राज्यभरातून साहित्यिकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे सचिव व साहित्य संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी केले आहे.
सदर संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार नवनियुक्त प्रदेश समन्वय समिती अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे, प्रा. सतीश मोरे, प्रा. हरिश्चंद्र सोनवणे, डॉ. अशोक सैंदाणे, युवराज वाघ, जयसिंग वाघ, बाबुराव वाघ, दिलीप सपकाळे, मिलिंद सोनवणे, समाधान सोनवणे, विनोद रंधे, प्रीतीलाल पवार यांनी केला. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक स्मृतीशेष बबनजी कांबळे यांना कार्यक्रम प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोठ्या संखेने साहित्यिक व इतर सामाजिक कार्यकर्ते सदर सभेला उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.