पाचोरा (प्रतिनिधी).येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित “शिंदे इंटरनॅशनल स्कूल” मधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज ता.13 रोजी उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये इयत्ता दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी संस्थेतर्फे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीतिका अग्रवाल, आदिती पोतदार, श्रुतिका जगदीश तेली यांनी विद्यालयातील आनंददायी आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या वतीने सुधीर गोडसे सर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “भारतीय संस्कृतीचे मूल्य जोपासत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण” देणे हा संस्थेचा उद्देश सफल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जगाच्या आकाशात गरुड झेप घ्यावी.” तसेच “या संस्थेशी, संस्थेतील शिक्षक तसेच वर्गमित्रांशी नेहमी नाळ जोडून ठेवावी, जगात जीवन जगताना चांगल्या मित्रांची मैत्री करा, व स्वतः सुद्धा एक चांगले मित्र बना” असा संदेश प्रा शिवाजी शिंदे यांनी यावेळी दिला.
“शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक परिपूर्ण नागरिक घडवणारे शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यात उंच ध्येय ठेवून मार्गक्रमण केले तर तुमच्या सोबतच संस्थेचा नावलौकिक वाढेल” असे उद्गार प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी व्यक्त केले.याप्रसंगी शिक्षक चंद्रकांत परदेशी, विजेता शर्मा मॅडम, राहुल तोतला, श्वेता शिरुडे, विजय महाजन,वर्षा देशमुख, मंगला गोडसे उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षिका रक्षंधा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.