कल्याण,(प्रतिनिधी)- “सख्खा बाप पक्का वैरी” या म्हणीला काही साजेशी घटना घडली आहे कल्याण मध्ये ,सख्ख्या भावानं सोळा वर्षीय बहीण आणि बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार करून पवित्र नात्याला काळीमा फासण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून घरातल्याच व्यक्तींनी अत्याचार केल्या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बाप आणि मुलावर बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुलीने शिक्षिकेला अत्याचारा बद्दल दिली माहिती…
पीडित सोळा वर्षाच्या मुलीने बाप आणि भाऊच लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकेला आणि मुख्यध्यापकांना दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
नराधम करत होते दोन वर्षां पासून अत्याचार..
गेल्या दोन वर्षांपासून मुलीचा बाप आणि भाऊ मुलीवर अत्याचार करत असल्याचं ऐकून शिक्षकांनाही धक्काचं बसला. पीडित मुलीने तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांची संपूर्ण पाढाचं पोलिसांसमोर वाचला. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत वडील आणि भावाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.४३ वर्षीय वडिलांनी आणि २० वर्षीय भावाने विनयभंग करत अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. दोघेही पीडितेवर २०१९ पासून अत्याचार करत होते असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.