जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.
वृषभ :-
सहकार्यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
मिथुन :-
राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.
कर्क :-
कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.
सिंह :-
कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.
कन्या :-
पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.
तूळ :-
सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.
वृश्चिक :-
तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योग्यायोग्याची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.
धनू :-
वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांति जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.
मकर :-
आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.
कुंभ :-
प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.
मीन :-
चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






