जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
शुभ रंग:निळा, शुभ अंक : ८
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदचित कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.
वृषभ :-
शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : १
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.
मिथुन :-
शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वत:ला जपा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. विश्वासातील व्यक्तिकडूनच विश्वासघात होऊ शकतो.
कर्क :-
शुभ रंग: निळा, शुभ अंक : ८
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
सिंह :-
शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.
कन्या :-
शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ९
हौशी मंडळी जिवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वत:चे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.
तूळ :-
शुभ रंग:मरून, शुभ अंक : ६
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहोद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.
वृश्चिक :-
शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ४
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आत अभ्यासात चालढकलच करतील.गृहीणींनी सासूबाईंकडून शाबासकीची अपेक्षा करू नये.
धनू :-
शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : २
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहूणे घरी पायधूळ झाडतील. महत्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.
मकर :-
शुभ रंग:मोरपिशी, शुभ अंक : १
आज स्वत:चेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच रहा.
कुंभ :-
शुभ रंग:लाल, शुभ अंक : ३
संध्याकाळी एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा अाहे बचतीचा विचारच सोडून द्या. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वाद मात्र टाळा.
मीन :-
शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ५
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






