तारकपूर येथील महिलेने पेटलेल्या अवस्थेत इमारती वरून मारली उडी.

Spread the love

महिला गंभीर जखमी

नगर : ३१ / नगर शहराच्या तारकपूर येथे एका महिलेने आज दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान स्वतःला पेटवून घेत दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना घडली आहे .

या महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन या महिलेचे नाव पूजा मनोहर चुग (वय ३३) असे असल्याचे समजते .

आज सकाळी ही घटना घडली असून सुरुवातीला सदर महिला ओरडत असल्याचा आवाज आला नंतर काही समजण्याच्या आतच महिलेने घराच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारताना नागरिकांनी पाहिले. येथे उपस्थित असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेस नगर जिल्हा रुग्णालय सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे महिलेच्या डोक्याला व हातपायाला गंभीर मार लागला आहे. सदर महिलेने पेटवून घेतल्याने तिच्या शरीराचा काही भाग जळाला आहे.

सदर घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना समजताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . या घटनेचा तोफखाना पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मात्र सदर महिलेने स्वतःला पेटवून घेतले की तिचा घातपात झाला असेल याबद्दल मात्र नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरु होती .

टीम झुंजार