पाचोरा :- तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे 2 व 3 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. दोन एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली व तीन एप्रिल रोजी धम्म जागृती रॅली जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत अत्यंत भव्य स्वरूपात काढण्याचे नियोजन आहे. सदर संमेलनातील विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील 200 साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत.
या संदर्भातील प्रचार आणि प्रसार जिल्हा तसेच राज्यभर वेगाने सुरू आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक भरत शिरसाठ या संदर्भात सभा घेऊन तसेच जनजागृती करून प्रत्येक तालुक्यात समन्वय समिती गठित करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मारक पाचोरा येथे बौद्ध साहित्य संमेलन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये साहित्य संमेलनाची संपूर्ण रूपरेषा व त्या संदर्भातील नियोजन प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी उपस्थितांसमोर मांडले.
सम्मेलनाच्या पाचोरा तालुका समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयु प्रविण ब्राह्मणे व सचिव आयु किशन सुर्यवंशी तथा पाचोरा शहराध्यक्ष पदी आयु संतोष कदम व सचिव आयु राजेंद्र खर्चाचे यांची बहुमताने निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख धनराज मोतीराय यांनी मनोगत व्यक्त केले. सल्लागार समिती सदस्य बी. एन. पाटील सदर सभेला उपस्थित होते.
यावेळी भाऊराव पवार,आनंद नवगिरे,अविनाश सावळे,जय वाघ,ए.बी.अहीरे, प्रविण ब्राह्मणे, प्रा इंगळे, रोहीदास बागुल, संतोष कदम, प्रदीप जाधव, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, संगिताताई साळुंखे, संजीवनी रत्नपारखी, वर्षा शिरसाठ ,राजरत्न पानपाटील , राजेंद्र खर्चाचे, अँड कैलास सोनवणे,चेतन नवगिरे,सचिन साठे, अँड गौतम गायकवाड, सुजित रत्नपारखी,किशन सुर्यवंशी, प्रशांत खरे,आदी समाज बंधु भगिनी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम