
महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांचा मुलगा असूनही नम्र, सुस्वभावी अशा जिप सदस्य प्रतापभाऊंचे सर्व तरुणांना आकर्षण आहे.

प्रतापभाऊ आज शिरसोली येथे द्वारदर्शनासाठी गेले असता, गावातल्या तरुणांनी चर्चा करण्यासाठी गाडी थांबवली असता गाडीतून उतरून रस्त्यातच तरुणांशी चर्चा सुरू केली.
ना कार्यालय, ना एसी ऑफिस रस्ता हेच आपले कार्यक्षेत्र हे प्रतापभाऊंचे सूत्र आहे.

कोणत्याही कामासाठी आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय भेटता येणारे नेतृत्व म्हणजे प्रतापभाऊ
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी शिरसोली येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी घेतला. याप्रसंगी सोबत माजी सभापती नंदूभाऊ पाटील, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच श्रावण बारी, माजी सरपंच नंदू वराडे, मा.सरपंच अनिल पाटील, मा.सरपंच प्रणय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, नितीन बुंधे, रईज भाई, ज्येष्ठ शिवसैनिक शेनफडू आबा आदी उपस्थित होते.