गुजरातमधील मेहराना येथे माजी सरपंचाने घराच्या छतावर उभे राहून नोटांची बरसात केली. कारण होतं पुतण्याचं लग्न. या माजी सरपंचाचे नाव आहे करीम यादव.ते केकरी तालुक्यातील अनगोळ गावचे माजी सरपंच आहेत. पुतण्याच्या लग्नाच्या वेळी त्यांनी घराच्या छतावर उभे राहून 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची बरसात केली. यावेळी नोटा जमा करण्यासाठी त्यांच्या घराखाली मोठी गर्दी झाली होती. यावेळी लोकांमध्ये बाचाबाची झाली.
करीम यादव जेव्हा नोटांचा वर्षाव करत होते, तेव्हा त्यांच्या पुतण्याची मिरवणूक गावातून जात होती. यावेळी करीम यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावाला नोटा वाटले. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जोधा-अकबर चित्रपटातील अझिमो-शान शहेनशाह हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.माजी सरपंच करीम यादव यांचा भाऊ रसूल यांचा मुलगा रज्जाकचे लग्न अत्यंत धूमधडाक्यात झाले.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावभर मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय नोटांचा पाऊसही पडला. सायंकाळी गावातून मिरवणूक निघाली. यावेळी करीम यादव आणि त्यांचे नातेवाईक घराच्या छतावर पोहोचले आणि त्यांनी तेथे नोटांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांनी 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांचा वर्षाव केला.

छताच्या आधी सरपंचाचे संपूर्ण कुटुंब नोटा उडवत होते, ते गोळा करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. लग्नाच्या सोहळ्यात कुटुंबीयांनी लाखो रुपयांच्या नोटा उडवल्याचे सांगण्यात येत आहे. हे लग्न 16 फेब्रुवारीला झाले. केवळ गावातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात या लग्नाची चर्चा आहे.

हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……